एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच
सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, चौथी जागा हाती लागावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेनं सर्वानुमते एक उमेदवार द्यावा अशी भूमिका घेतली आहे.
मुंबई : राज्यसभेतील 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात जागा रिकाम्या होणार आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या 2, भाजप 2, तर काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, माजिद मेमन, अमर साबळे, हुसेन दलवाई, राजकुमार धूत आणि संजय काकडे या खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. संख्याबळानुसार सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे
सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, चौथी जागा हाती लागावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेनं सर्वानुमते एक उमेदवार द्यावा अशी भूमिका घेतली आहे.
सध्या या सातव्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सातव्या जागेसाठी दोनही पक्षाचे प्रमुख आपली ताकद लावत असून अनेक तडजोडी करत आहे. कारण दोन्ही पक्षांना आपलं केंद्रातलं स्थान अधिक मजबूत करायचंय त्यामुळे या सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 खासदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकतात.
सध्या शिवसेनेचे 56 ( एका खासदाराला 37 मतं, उरली 19 मतं ), राष्ट्रवादी काँग्रेस 54 ( एका खासदाराला 37 मतं, उरली 17 मतं ) आणि काँग्रेसचे 44 ( एका खासदाराला 37 मतं, उरली 7 मतं ) आहे. ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की सातवा खासदार निवडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकमेकांची गरज आहे पण कोण कोणाची गरज भागवणार? यावर प्रश्नचिन्ह आहे
सातवी जागा ज्याला कोणाला मिळेल त्याला एका जागेसाठी राज्यात मित्रपक्षासोबत महत्त्वाच्या वाटाघाटी कराव्या लागतील. केंद्रातलं स्थान भक्कम बनवण्यासाठी दोन्ही पक्ष या तडजोडीसाठी तयार असल्याचं कळतं आहे.
सध्या महाविकास आघाडीतसोबतच केंद्रात पवाराचं असलेलं वजन पाहता सातव्या जागेवर पवार कब्जा करतील अशी शक्यता आहे. आगामी काळातलं केद्रातलं राजकारण, केंद्रातले पवाराचं मित्र लक्षात घेता शिवसेनेसोबत राज्यात काही महत्त्वाच्या वाटाघाटी करत सातवी जागा राष्ट्रवादीला जाईल पण शिवसेना या वाटाघाटी करायला तयार असेल? असा सवाल उपस्थित होतो.
EXPLAINER VIDEO | Private Member Bill | नेहमी चर्चेत येणारं खासगी विधेयक आहे तरी काय? | ABP Majha
संबंधित बातम्या :
'नीरा देवघर'चा वाद कोर्टात, खासदार रणजित निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
Majha Impact | मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement