शिवसेनेचे कोणते आमदार अपात्र ठरणार? 14 तारखेला 12 वाजता हजर राहा, ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना अध्यक्षांनी बोलावलं!
शिवसेना ठाकरे (Shiv Sena Thackeray camp) गटाच्या सर्व आमदारांना उद्या गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केल्या आहेत
मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या (Shiv Sena MLA disqualification case) नोटीसबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना उद्या गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्या आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
वैभव नाईक म्हणाले, "14 सप्टेंबरला म्हणजेच उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आम्हाला (ठाकरे गटाच्या आमदारांना)उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे. आम्ही आमचं म्हणणं लेखी स्वरुपात काल आणि आज अध्यक्षांकडे सादर केलेलं आहे. अध्यक्षांच्या म्हणन्यानुसार लेखी आणि तोंडी उत्तर आम्ही सुनावणी दरम्यान देऊ"
सुनील प्रभू हे आमचे मुख्य प्रतोद
आम्ही मागच्या वेळी वैयक्तिक वकील पत्र सर्व आमदारांनी एकत्रित अध्यक्षांना दिलं होतं. आधी तसंच वकिलामार्फत आमचे लेखी म्हणणं आम्ही वैयक्तिकरित्या अध्यक्षांना देत आहोत. सुनील प्रभू हे आमचे मुख्य प्रतोद आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वैधतेबद्दल टिपणी केली आहे, असंही वैभव नाईक यांनी सांगितलं.
16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, मग सर्व आमदारांना सुनावणीसाठी का बोलावलं जात आहे?, असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.
अध्यक्षांना तात्काळ निर्णय घ्यावा
शिवसेनेचे प्रतोद कोण आहे? शिवसेना नेमकी कोणाची आहे सगळ्यांना माहिती आहे. फक्त या निर्णयाकडे सर्व जनतेचं सुद्धा लक्ष लागलं आहे.
अध्यक्षांनी स्वतः लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची आणि लोकांची इच्छा आहे, असं वैभव नाईक यांनी सांगितलं.
आमचे 54 आमदार जे निवडून आले, त्यांचे प्रतोद हे सुनील प्रभू आधी सुद्धा होते आणि कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आता सुद्धा आहेत. 23 जूनला आम्ही या अपात्रते संदर्भात आमचं म्हणणं अध्यक्षांकडे दिलं होतं. त्यानंतर आता किती महिने झाले? हा निर्णय लवकर लागणार नाही यामध्ये वेळ काढूपणा केला जाईल अशी कुजबूज आम्हाला आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
संबंधित बातम्या
Ajit Pawar : अजित पवार गटाचं ट्विटर हॅण्डल सस्पेंड, नेमकं कारण काय?