Shiv Jayanti 2023: मुख्यमंत्री शिंदे यांनी विमानातून रशियातील शिवप्रेमींशी साधला संवाद; पाहा व्हिडीओ
Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti) राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये (russia) साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला आहे.
रशियामधील ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 750 मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यंदा त्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या आयोजनाची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.
"आपण आपल्या मातृभूमीपासून लांब राहूनही शिवजयंतीचा सण (chhatrapati shivaji maharaj jayanti) साजरा करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मी स्वतः देखील आग्र्यामधील लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी जात असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र तुम्ही सगळ्यांनी आपला अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून शिवजयंती साजरी करत आहात, हे खरंच फार मोठी गोष्ट असून तुम्हा सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो'', असे मुख्यमंत्र्यांनी या भावी डॉक्टरांना सांगितले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादामुळे सातासमुद्रापार शिवप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
Shiv Jayanti 2023: लंडनमध्ये शिवजयंती साजरी
लंडन (London) येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथील संसद चौकात शिवजयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थांनी जय शिवराय अशा घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देणारे अनेक युद्ध साहित्य लंडन येथिल म्यूजियमला आहे. शिवाजी महाराजांचे एक अस्सल पेंटिंग देखील ब्रिटिश लायब्ररीला आहे. जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या संसद चौकात साजरी करताना उपस्थित युवकांत नवचैतन्य निर्माण झाले होते.