एक्स्प्लोर
शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांचे कान उपटले!
2019 हे वर्ष राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे 2019ला पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं होतं.
कर्जत (रायगड) : आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे कान उपटले. काल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार 2019 साली पंतप्रधान होतील, अशी आशा व्यक्त केली होती. त्यानंतर आज पवारांनी कर्जतमध्ये आयोजित चिंतन बैठकीत आपले मत मांडले.
पटेलांना उद्देशून पवार नेमकं काय म्हणाले?
“प्रफुल्ल पटेल यांनी कारण नसताना पंतप्रधानपदाचा मुद्दा काढला. आपण जागा निम्म्या लढवून देशाचं नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणं अवास्तव आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका.”, असे शरद पवार म्हणाले.
प्रफुल्ल पटेल काल काय म्हणाले होते?
2019 हे वर्ष राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे 2019ला पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं होतं.
‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement