एक्स्प्लोर
''अवैध फटाके विक्रीवर कारवाईसाठी समिती स्थापन करा''

मुंबईः बेकायदेशीर फटाक्यांच्या विक्रीवर कारवाईसाठी प्रत्येक वॉर्डात समिती स्थापन करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. बेकायदेशीर फटाक्यांविरोधातील याचिकेवर सुनावणी देताना हायकोर्टाने हा निर्णय दिला. फटाक्यांच्या आवाजाने ध्वनी प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे सर्व पालिकांनी कारवाई करणं गरजेचं आहे. दिवाळी दरम्यान यामुळे आग लागण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे कडक कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. फटाके विक्रीसाठी परवानगी देताना प्रशासनाने सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी करावी, असे आदेशही कोर्टाने दिले. ठाण्यातील प्रत्येक वॉर्डात सर्रासपणे बेकायदा फटाक्यांची विक्री चालू आहे. विक्रत्यांना पोलिसांनीच परवाना दिलाय, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
आणखी वाचा























