एक्स्प्लोर
विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तारीख ठरली !
मुंबई : विरोधकांच्या पहिल्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचा पनवेलमध्ये समारोप झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्याची तयारीही विरोधकांनी केली आहे. येत्या 15 एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा सुरु होणार आहे.
संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली.
बैठकीला कोण कोण उपस्थित होते?
या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांसह अनेक नेते उपस्थित होते.
संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कसा असेल?
दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. या बैठकीत यात्रेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आला.
कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून लवकरच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement