एक्स्प्लोर

कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा, BMC च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस, किरीट सोमय्या यांचा आरोप

कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला असून याच संदर्भात मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

Mumbai News : कोरोना काळात (Corona Pandemic) कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला असून याच संदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस (ED Notice) आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. हा संपूर्ण घोटाळा 100 कोटी रुपयांचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे (Covid Center) कंत्राट दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्या संदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

कोरोना काळात बीएमसीकडून कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर इथले जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या कंपनीने जून 2020 ते मार्च 2022 पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचं निदर्शनास येताच पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरु ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन इथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला.

आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि त्या संदर्भात बीएमसीकडे काही माहिती आणि कागदपत्रे मागवली आहेत. मात्र बीएमसीकडून या संदर्भात कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी ईडीने नोटीस पाठवली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या प्रकरणात नेमके आरोप काय आहेत?

कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं. 

शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे

ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शाह ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत. तर बीएमसीला सादर केलेल्या पार्टनरशिप डीड खोटी आणि बनावट असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत, असा आरोप आहे

या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टरांनी ज्युनिअर, इंटर्न डॉक्टर नेमल्याचे आणि कंत्राटमधील अटी व शर्तींचा भंग केल्याचा निदर्शनास आलं 

संबंधित कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करुन 25 लाख रक्कम जप्त केली

त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली

त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आले

मुंबई महापालिका आयुक्तांनी आरोपांवर उत्तरे द्यावीत : मनसे

आता यावर मुंबई महापालिका आयुक्तांनी या सगळ्याची जबाबदारी घेऊन या आरोपांवर उत्तर द्यावीत, ईडी चौकशीला सामोरे जावे, शिवाय याआधीच्या सरकारमध्ये कोणाच्या सांगण्यावरुन हे कॉन्ट्रॅक्ट दिले हे सुद्धा समोर यावं अशी मागणी मनसेने केली आहे.

एकीकडे बीएमसीच्या कोरोना काळातील व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरु असताना आता यात कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपात ईडीकडून बीएमसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची चौकशी केली जात असेल तर खरंच ही सगळी कंत्राटं कशी मिळवली? यात खरंच गैरव्यवहार झाला का? आणि जर घोटाळा झाला असेल तर आणखी कोणाची नावं यामध्ये समोर येतात?  हे या तपास यंत्रणांच्या चौकशीनंतर समोर येईल.

VIDEO : Kiriti Somaiya on Covid 19 Scam : "कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा, चौकशीला सुरुवात होणार"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget