Shiv Sena Press Conference Highlights : मला जेलमध्ये घाला, गोळी घाला, पण मी घाबरणार नाही : संजय राऊत
Sanjay Raut Shiv Sena Press confernece Highlights: दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत शिवसेना कोणता बॉम्ब फोडणार याकडे राज्याचं लक्ष

Background
Sanjay Raut Press Conferance : भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आजच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे.
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
संजय राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं होतं.
Shivsena : शिवसेनेच्या निशाण्यावर असणारे भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण? 'या' नावांची चर्चा
Shivsena Press Confernce : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही नावं उघड होण्याची शक्यता आहे.
'हीच का तुमची लोकशाही'?, मोदी आणि शाहा यांना राऊतांचा सवाल
'माझ्याशी वैर असेल तर मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास देता?, हीच का तुमची लोकशाही' असा सवाल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना राऊतांनी केला आहे.
2024 मध्ये देशात परिवर्तन येईल - संजय राऊत
आगामी निवडणूकीत 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल अस यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.























