Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना रात्री उशिरा अटक, आज कोर्टात हजर करणार
Sanjay Raut Arrest : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे.
Sanjay Raut Arrest : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.
संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले. राऊत यांच्या घरी काल सकाळीच ईडीचे (ED) पथक दाखल झाले होते. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या घरातून जप्त करण्यात आली. याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलं. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामिन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.
काय घडलं सकाळी सातपासून
रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले.
सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते.
सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले.
सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांनी केले.
सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया.
सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले.
सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली.
दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी साडेतीन वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची ईडीकडून तयारी
दुपारी 3.50 वाजाता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले.
दुपारी 4 .10 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन त्यांच्या निवास्थानाबाहेर पडले.
दुपारी 4. 20 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले,यावेळी पोलीस आणि शिवसैनिकंमध्ये बाचाबाची झाली.
संजय राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेल्याची 4.30 वाजता बंधू सुनील राऊत यांची माहिती
ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतल्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने केली.
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही!, संजय राऊतांचे पाच वाजता ट्वीट
मरेन पण, झुकणार नाही; संजय राऊत, साडे पाच वाजता संजय राऊतांचा माध्यमांसोबत संवाद
ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून साडे सहा वाजता 11.50 लाख रुपये जप्त
संध्याकाळी पावणे आकरा वाजाता व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार रात्री पावणे बारा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले.
रात्री 11.38 मिनिटांनी संजय राऊत यांना ईडीकडून अटक
आज काय होणार
संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई, जाणून घ्या सकाळी सातपासून रात्री 12 पर्यंत काय घडलं
Aniket Nikam on Sanjay Raut : संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय? कायदेतज्ञ काय सांगतात?