एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई जिंकण्यासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला, निरुपम यांचे तीन मुद्दे
मुंबई : खड्डेमुक्त रस्ते, कचरामुक्त मुंबई, शुद्ध आणि मोफत 24 तास पाणी हे तीन मुद्दे घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी 'माझा कट्टा'वर काँग्रेसचा अजेंडा मांडला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस मुंबईसाठी काय करणार या प्रश्नावर संजय निरुपम यांनी तीन मुद्द्यांसह जनतेसमोर जाणार असल्याचं सांगितलं. "मुंबईकरांना मोफत पाणी देणार असल्याचं निरुपम म्हणाले. पाणवाटप मर्यादित असेल. यामुळे मनपाला जास्त नुकसानही होणार नाही. कमर्शियल वापराला पाणी देणार नाही. झोपडपट्टी आणि इमारतीत राहणाऱ्यांनाच 24 तास मोफत पाणी देऊ," असं निरुपम यांनी सांगितलं.
"तसंच सध्या प्रॉपर्टी टॅक्सवर आम्ही काम करत आहोत, त्याबाबत मी आता फारसं बोलणार नाही," असंही ते म्हणाले.
याशिवाय मुंबईतील खड्डे पाहता रोड डॉक्टर नावाची मशिन आणण्याच्या विचारात असल्याचं संजय निरुपम म्हणाले. "हैदराबाद महापालिकेकडे ही सिस्टम आहे. रस्त्यावर खड्डा दिसल्यास कॉल करा, काही वेळातच कर्मचारी येतील आणि खड्डे बुजवती. या मशिनला त्यांनी रोड डॉक्टर नाव दिलं आहे," अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.
राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच, असं स्पष्ट वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. "आघाडी नसताना आम्ही 70 जागा जिंकलो, पण आघाडी झाल्यावर 52 जागा जिंकलो होतो, यावेळी आघाडी न करण्याचा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. एकाही नेत्याची राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची इच्छा नाही आणि माझंही तेच मत आहे," असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना-भाजपवर निशाणा
शिवसेना-भाजप युतीने 20-22 वर्षात मुंबई शहरला बरबाद केलं. आतापर्यंत शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यातील एकाही बाबीची पूर्तता केली नसल्याचीही टीका निरुपम यांनी केली आहे. तसंच महापालिकेच्या कारभाराबाबत भाजपची शिवसेनेवरील टीका म्हणजे निव्वळ नाटक असल्याचंही ते म्हणाले.
नोटबंदी हाच मोठा घोटाळा
नोटबंदी हाच मोठा घोटाळा असल्याचं सांगत संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. "नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं, नोटाबंदीचा छोट्या उद्योजकांवर परिणाम झाला. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय विचार न करता घेतला, त्यामुळेच जनतेला अजूनही अडचणी येत आहेत. दहशतवादाला रोखण्यासाठी नोटाबंदी, हा नरेंद्र मोदींचा दावा म्हणजे वेडेपणा असल्याची जळजळीत टीका संजय निरुपम यांनी केली." तसंच नोटाबंदीनंतर भाजप नेत्यांकडूनच काळं धन जप्त झाल्याचा दावा निरुपम यांनी केला.
नरेंद्र मोदी सर्वात मोठे हुकूमशाह
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवून मोदींचा फोटो लावल्याबाबच विचारलं असतान निरुपम म्हणाले की, "भाजपचा लोकशाहीवर नाही हुकूमशाहीवर विश्वास आहे. तर नरेंद्र मोदी सर्वात मोठे हुकूमशाह आहेत. गांधी अहिंसेचे पुजारी होते, पण मोदी हिंसेचे, हुकूमशाहीचे पुजारी आहेत. मोदींना गांधी बनवा, मार्टिन ल्युथर किंग बनवा, हिटलर बनवा, पण गांधींना हटवू नका."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement