मोदींकडून सफाई कामगारांचा पाय धुवून सन्मान, तर मुंबईत सफाई कामगारांचा वेतनासाठी झगडा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतादूतांचे पाय धुतले, त्यानंतर अनेकांनी मोदींना या कृत्याचं कौतुक केलं. मात्र दुसरीकडे मुंबईचे स्वच्छतादूत असलेल्या मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांची अवस्था खराब आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सफाई करणाऱ्या कामगारांचे पाय धुवून अनोखा सन्मान केला. मात्र दुसरीकडे मुंबईची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचा आपल्या हक्काच्या वेतनासाठी झगडा करावा लागत आहे. कंत्राटी सफाई कामगारांच्या किमान वेतनाचा जीआर आज सफाई कामगारांनी केरात टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतादूतांचे पाय धुतले, त्यानंतर अनेकांनी मोदींना या कृत्याचं कौतुक केलं. मात्र दुसरीकडे मुंबईचे स्वच्छतादूत असलेल्या मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांची अवस्था खराब आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथे काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन जाहीर करणारा शासनादेश (जीआर) 2015 मध्ये महाराष्ट्र शासनानं काढला मात्र आजतागायत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. मुंबई महापालिका क्षेत्रात 6 हजार कंत्राटी सफाई कामगार आहेत. या सफाई कामगारांनी आज आझाद मैदानावर आंदोलन करत सरकारनं काढलेल्या जीआरला कचऱ्यात फेकत आणि जीआर वापसी आंदोलन केलं.
मोदींना स्वच्छता कामगारांचा पाय धुवून सन्मान केला, ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र सफाई कामगारांना समाधानकारण वेतन मिळणेही गरजेचं आहे, हा या आंदोलनाचा उद्देश होता.