एक्स्प्लोर
Advertisement
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम अडचणीत आले आहेत. या संकटामुळे 2020 वर्षातील अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे रद्द करण्यात आले आहे. अगदी पंढरपूरच्या आषाढी वारीवर देखील कोरोनाचे संकट आहे. अशातचं आता गणेशोत्सव येत असल्याने सर्वच गणेशभक्तांना मूर्ती शाळेतील कलाकारांना चिंता लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
एकच धून 6 जून! छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होणारचं : छत्रपती संभाजीराजे
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी नियमावली
वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र, केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे.
- श्रीमूर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे.
- मंडप/रोषणाई - मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.
- आगमन - श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .
- श्रीदर्शन - मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इ) हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे.
- कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.
- विसर्जन - आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी, जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement