एक्स्प्लोर

Jaipur Express Firing : तब्येतीच्या कारणावरुन वाद आणि रागाच्या भरात गोळीबार; RPF शिपायाने सांगितला ट्रेनमध्ये घडलेल्या हत्याकांडाचा घटनाक्रम

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै गोळीबाराची घटना घडली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला.

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) गोळीबाराची घटना घडली, ज्यात आरपीएफ शिपायाने आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपायाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकाऱ्याच्या जबाबानुसार बोरीवली जीआरपीने आरोपी चेतन सिंहवर गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य (वय 26 वर्षे) यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला. आरपीएफ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासोबत तब्येतीच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर चेतनने रागाच्या भरात गोळीबार केल्याचं अमेय आचार्य यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

चेतन सिंहने तब्येत बिघडल्याचं दिलं होतं कारण 

फिर्यादी अमेय आचार्य हे त्या रात्री आरोपी चेतन सिंहसोबत मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ड्युटी करत होते. आपली तब्येत बिघडली असून आपल्याला वलसाड इथे उतरु द्यावं, असं आरोपी चेतन सिंह हा ASI टिकाराम मीणा यांना सांगत होता, असं आचार्य यांनी आपल्या जबाबात सांगितलं.

चेतन सिंह कोणाचंच ऐकत नव्हता

ASI टिकाराम मीणा, इन्स्पेक्टर हरिश्चंद्र यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधला असता तिथल्या अधिकाऱ्यांनी ASC (असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर) सुजित कुमार पांडे या सर्वांनी चेतन सिंहला समजवायचा प्रयत्न केला की दोन-तीन तासांची ड्युटी बाकी आहे. गाडी मुंबईला पोहोचेपर्यंत आराम करुन तिथे जाऊन औषधोपचार कर उपचार करावेत. पण चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

चेतन सिंहने रागाच्या भरात रायफल काढून घेतली 

तरीही अमेय आचार्य यांनी चेतन सिंहला B/4 या बोगीमध्ये नेलं. तिथे जाऊन एका रिकाम्या सीटवर झोपवलं आणि त्याची रायफल घेऊन बाजूच्या सीटवर बसून होते. पंरतु चेतन सिंह जास्त वेळ झोपला नाही. 10 ते 15 मिनिटांनी तो उठला आणि रायफल घेऊन निघाला. 

चेतन सिंह हा ASI टिकाराम मीणा यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी वाद घालत होता. ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो त्यांचं ऐकत नव्हता.

यानंतर मात्र चेतनने आपल्या रायफलची सेफ्टी कॅच हटवला. तो फायरिंग करण्याच्या मनस्थितीत होता. हे सर्व सुरु असताना फिर्यादी आचार्य हे तिथून निघून पॅन्ट्रीमध्ये गेले.

आचार्य यांना गोळीबार संदर्भात कॉल आला  

आपण पॅन्ट्री कारमध्ये असताना 05.25 वाजता कॉन्स्टेबल कुलदीप राठोड यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ASI टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार झाला आहे, असा आचार्य यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केलं आहे.

आचार्य हे B/5 कोचच्या दिशेने जात असताना त्यांनी पहिले की चेतन सिंगच्या हातात रायफल होती आणि रायफल ट्रेनच्या दिशेने ताणलेली असून तो अधूनमधून गोळीबार करत होता.

थोड्यावेळात कोणीतरी चैन ओढली आणि चेतन सिंह हा खाली उतरुन ट्रॅकवरुन चालत मिरारोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होता. त्याच्या हातात रायफल तशीच होती असं आचार्य यांनी जबाबात म्हटलं आहे.

या सर्व प्रकरणाच चेतन सिंह या आरोपीने एक आरपीएफ अधिकारी तर तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली.  

त्या रात्री कोण कोण होते ड्युटीवर?

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. 

या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. 

रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा हा प्रकार घडला. 

हेही वाचा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  23 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :23 डिसेंबर 2024 : ABP MajhaUnder 19 Asia Cup Women Team India  : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget