एक्स्प्लोर
नातीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला आजीकडून जन्माची अद्दल
मुंबई : नातीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला एका धाडसी आजीबाईंनी जन्माची अद्दल घडवली आहे. चाकूचा धाक दाखवून शाळकरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमियाला 67 वर्षांच्या आजीनं तुरुंगात धाडलं आहे.
नववीत शिकणारी विद्यार्थिनी दुपारी शाळेतून परत येत असताना 19 वर्षीय प्रेमकुमार यादवनं तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत तिला गाठून छेड काढली. मुलीनं कशीबशी स्वतःची सुटका करुन घर गाठलं.
घामाघूम झालेल्या नातीला पाहून आजीही क्षणभर अवाक झाली. मात्र ही गोष्ट आजीला समजली, तेव्हा तिनं थेट घटनास्थळी जाऊन रोडरोमियोच्या मुसक्या आवळल्या. आजीबाईंनी आरोपीला यथेच्छ चोप तर दिलाच, पण तुरुंगाची हवा खाण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीनही केलं.
यापूर्वीही त्याने अनेक वेळा पाठलाग केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. उत्तर प्रदेशातून आलेला आरोपी प्रेमकुमार यादवला पोस्को कायद्यांतर्गत अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement