एक्स्प्लोर
Rishi Kapoor | ऋषि कपूर यांची एक्झिट व्यक्तिगत हानी, फॅमिली डॉक्टर डॉ. ओ पी कपूर यांची भावना
डॉ. ओपी कपूर हे ऋषि कपूर आणि त्यांच्या दोन्ही भावांच्या संबंध कारकिर्दीचे साक्षीदार राहिलेले आहेत. राज कपूर यांच्याशीही डॉ. ओ पी कपूर यांचा स्नेह होता.
मुंबई : ऋषि कपूर यांची एक्झिट ही व्यक्तिगत हानी आहे, संपूर्ण कपूर कुटुंबातील सर्वात चांगला माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे, अशा भावना त्याचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. ओ पी कपूर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर याचं आज सकाळी मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होते.
अभिनेते ऋषि कपूर यांच्या निधनाविषयी त्यांचे फॅमिली डॉक्टर आणि मित्र डॉ. ओ पी कपूर यांनी एबीपी माझा डॉट इनशी फोनवरुन बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. ओपी कपूर हे ऋषि कपूर आणि त्यांच्या दोन्ही भावांच्या संबंध कारकिर्दीचे साक्षीदार राहिलेले आहेत. राज कपूर यांच्याशीही डॉ. ओ पी कपूर यांचा स्नेह होता.
ऋषि कपूर यांच्याशी तब्बल 55 वर्षांचा संबंध असलेल्या डॉ. ओ पी कपूर यांनी सांगितलं की संपूर्ण कपूर घराण्यातील सर्वात उमदं व्यक्तीमत्व असलेले ऋषि कपूर यांचं जाणं हे त्यांच्यासाठी व्यक्तीगत हानी आहे. संपूर्ण कपूर घराण्यात ते सर्वाधिक निरोगी होते, त्याचं वजनही त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवलं होतं. त्यांना मधुमेहाचा त्रास सुरु झाल्यावर त्याचं वजन थोडं वाढलं. त्यांच्या कॅन्सरचं प्राथमिक निदान झाल्यावर मीच त्याला अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला असंही डॉ. कपूर सांगतात.
ऋषि कपूर आणि मी अनेकदा दक्षिण मुंबईतल्या विलिंग्टन क्लबमध्ये भेटायचो. तिथे भेट झाली की ते सर्वात आधी वाकून नमस्कार करायचे. विलिग्ंटन क्लबमध्ये आजूबाजूला कितीही जण असले तरी ऋषि कपूर यांनी कधीही वाकून पदस्पर्श करणं सोडलं नाही, हे डॉ. कपूर आवर्जून सांगतात.
Rishi Kapoor | ऋषी कपूर यांना बॉलिवूडची श्रद्धांजली, लतादीदी, बिग बी, रजनीकांत, आमीरसह दिग्गज गहिवरले
ऋषि कपूर माझ्याशी नेहमीच सर्वाधिक आत्मियतेने वागत असत. मी त्यांचा फॅमिली कन्सल्टंट. खूप लहानपणापासून स्टारडम त्यांच्या आजूबाजूला असलं तरी कधीही त्यांनी मला वैद्यकीय कारणासाठी त्यांच्या घरी बोलावलं नाही. ते स्वतः माझ्या क्लिनिकवर यायचे किंवा क्लबवर भेटायचे. काही रिपोर्ट वगैरे दाखवायचे असतील तर अनेकदा आम्ही क्लबवर भेटायचो, तिथेच त्यांना मी आवश्यक वैद्यकीय सल्ले द्यायचो. जेव्हा निकडीच्या वेळी क्लबवर किंवा क्लिनिकमध्ये भेटणं शक्य व्हायचं नाही, तेव्हाच ते फोनवरुन चर्चा करायचे असंही डॉ. कपूर सांगतात.
त्यांच्या वैद्यकीय अध्यापन कार्याला 65 वर्षे पूर्ण झाल्यावर जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याला ऋषि कपूर आपले चिरंजीव रणबीर कपूरसह आवर्जून उपस्थित होते. फक्त एका फोनवर त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि आपल्या चिरंजीवासह ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ही आठवण डॉ. कपूर अभिमानाने सांगतात.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 65 वर्षे विनाशुल्क लेक्चर घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीय.
डॉ. ओ पी कपूर हे ऋषि कपूर यांना वयाने ज्येष्ठ असल्यामुळे जेव्हा कधी भेटतील तेव्हा किंवा फोन वगैरेवर चर्चा होईल तेव्हा आवर्जून तब्येतीची विचारपूस करायचे, आपल्या तब्येतीची माहिती द्यायचे. अमेरिकेत त्यांच्यावर झालेल्या उपचाराविषयीही ते माहिती द्यायचे. त्यांना असलेला कॅन्सर हा क्लिष्ट प्रकारातला होता. त्यांना झालेला कँसर वय झाल्यावरच होतो. पण शेवटपर्यंत त्याला झुंज दिली. ऋषि कपूर याचं जाणं हे सहन होण्यापलिकडचं असल्याचंही डॉ. कपूर यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement