एक्स्प्लोर

Rhea vs SSR's Sister Case: सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी त्याच्या एका बहिणीला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई पोलिसांनी मीतू सिंहविरोधात दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द. रियाच्या तक्रारीवरून प्रियंका सिंहविरोधातील गुन्हा रद्द करण्यास मात्र हायकोर्टाचा नकार. प्रियकांविरोधात मिळालेल्या पुराव्यांचा तपास होणं गरजेचं : हायकोर्ट.

मुंबई : रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या दोनपैकी एकीला दिलासा मिळालाय तर दुसरीच्या पदरी मात्र निराशाच पडलीय. मीतू सिंह हिच्याविरोधातील तक्रार रद्द करण्याचे आदेश सोमवारी हायकोर्टानं जारी केलेत. मात्र, प्रियंका सिंह हिच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचं कोणतंही कारण दिसत नसल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं तिला दिलासा नाकारला आहे. याविरोधात आता प्रियंका सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांचे वकील माधव थोरात यांनी एबीपी माझाला सांगितलं. या याचिकेवर 7 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं राखून ठेवला आपला निकाल सोमवारी जाहीर केला.

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारीवरून आम्ही रितसर गुन्हा नोंदवला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आम्ही तो गुन्हा आता सीबीआयकडे सुपूर्दही केला आहे. सुशांतच्या मोबाईलवरून जी माहिती मिळालीय त्यात सुशांतची बहीण प्रियंकानं त्याला बनावट प्रिस्क्रिप्शन बनवून एनडीपीएस कायद्यानं प्रतिबंधीत केलेली औषधं मिळवून दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. ज्याचा तपास होणं गरजेचं असल्याचा दावा मुंबई पोलिसांतर्फे हायकोर्टात करण्यात आला.

काय होते रिया चक्रवर्तीचे आरोप?

तर आत्महत्येला प्रवृत्त करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी मदत करणं हा जास्त मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. असं सांगत जोपर्यंत आपण सुशांतसोबत होतो तोपर्यंत त्याला सांभाळतच होतो. रिया त्याच्या घरातून बाहेर पडली आणि काही दिवसांतच सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचललं. यासाठी सुशांतच्या घरचेच जबाबदार आहेत, असा दावा करत आपण दाखल केलेल्या तक्रारीवर ठाम आहोत असं रिया चक्रवर्तीच्यावतीनं ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला सांगितलं होतं.

Drug Case | एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवालाला अटक

सीबीआयची भूमिका रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींवर केलेले हे आरोप हा केवळ एक तिचा एक अंदाज आहे, त्यामुळे यावर मुंबई पोलिसांनी थेट गुन्हा कसा दाखल केला? तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, याची मुंबई पोलिसांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्यांनी रियाची तक्रार परस्पर नोंदवून न घेता ती सीबीआयकडे पाठवायला हवी होती अशी भूमिका अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सीबीआयच्यावतीनं हायकोर्टात स्पष्ट केली.

प्रकरण नेमकं काय? सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला अशी तक्रार रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी हायकोर्टात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देत होती, असा आरोप रियानं केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस स्थानकात 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kalyan Dombivali News : भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा नाराजीनाट्य, मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी
Dhurla Nivadnukicha : Superfast News : 18 Nov 2025 : 5 PM : Maharashtra Superfast : ABP Majha
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Embed widget