राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 चं ठेवावे; खटूआ समितीचा रिपोर्ट
राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची निवृत्तीचे वय 58 चं ठेवावे, अशी शिफारस खटूआ समितीने आपल्या अहवालात केली आहे.
मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षचं ठेवण्याची शिफारस खटूआ समितीच्या अहवालातून करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्यास निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीचा अहवाल आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने याला विरोध केला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भातील खटुआ समितीचा अहवाल कुचकामी व अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
खटुआ समितीच्या शिफारशी
- सेवानिवृत्तीचे सध्याचे वय 58 वर्षे आहे ते तसेच ठेवावे.
- गट - ड मधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात पुनःपरिक्षण करुन अन्यश्रेणीतील कर्मचाऱ्यांऐवढे म्हणजेच 58 वर्षे करावे.
- त्याचवेळी, जे गुणवत्ताधारक कर्मचारी आहेत आणि ज्यांना गंभीरपणे 58 व्या वर्षापुढे 60 व्या वर्षापर्यंत काम करण्याची इच्छा आहे. त्यांना शासकीय आणि सार्वजनिक हितासाठी संधी देणे आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा विरोध
बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीचा दोन-अडीच वर्षांपासून हरवलेला अहवाल, शेवटी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून प्राप्त झाला. इतक्या बेजबाबदार पद्धतीने सादर झालेला, आपल्या लोकशाही देशातील पहिला दस्तावेज असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने याला विरोध केला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भातील खटुआ समितीचा अहवाल कुचकामी व अनाकलनीय असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.राज्यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गाची संख्या जवळपास साडेतेरा लाखांच्या आसपास आहे. 60 व्या वर्षी हे कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले तर रिक्त पदे आणि पेन्शनधारक सदस्यांची संख्या वाढणार आहे. सोबतच वेतन आयोगही लागू करावा लागणार आहे. त्यामुळे जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा पगारवाढ आणि पेन्शनवाढीमुळे अतिरिक्त बोजा राज्य सरकारवर पडणार आहे.
Navratri Utsav | नवरात्रीत देवीच्या मूर्तीला 4 फुटांची मर्यादा; राज्य सरकारचा निर्णय