एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देश
युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव यांच्या धर्तीवर राज्यपालांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं नामनिर्देशन केलय.
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 अन्वये विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि शैक्षणिक औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आणि ख्यातनाम उद्योगपती सल्लागार परिषदेचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करावयाची तरतूद असल्याने राज्यपाल यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नामनिर्देशन केले आहे.
तर संशोधन व विकास विषयक धोरणे व कृतियोजना यासंबंधात कार्यवाही करणाऱ्या राष्ट्रीय आणि जागतिक संस्थामधील कार्याचा अनुभव असलेले ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. तर उर्वरित दोन सदस्यांचे नामनिर्देशनही लवकरच करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू हे पदसिद्ध सदस्य म्हणून सल्लागार समितीचे काम पाहणार आहेत.
वाडियांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात रतन टाटांसह अन्य संचालकांना हायकोर्टाचा दिलासा
शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृतियोजना सादर करुन त्याद्वारे कुलगुरूना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरुन विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ व्यवस्थेच्या संपूर्ण कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी एक कार्यतंत्र व धोरण निश्चित करणे आणि कार्याचा लेखाजोखा ठेऊन विद्यापीठाची प्रगती आणि त्याच्या कार्यात्मक सक्रियतेचे परिणाम आणि समाजातील त्याची अनन्यता याबाबतची माहिती देणे आणि सुक्ष्म विश्लेषण करुन भाष्य करणे यासाठीही सल्लागार परिषदेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.
सुधा मूर्ती : रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांच्यातील भावनिक नात्याचा दुवा!
विशेष म्हणजे उपायात्मक यथार्थदर्शी नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या वृद्धीकरीता महत्वाचे असे विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार अध्यक्षास असल्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Majha 20-20 | इन्स्टाग्राम रतन टाटंचं ऑनलाईन कुटुंब | दुपारच्या घडामोडींचा वेगवान आढावा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement