Maratha Reservation: मराठा ठोक क्रांती मोर्चाचा फडणवीसांच्या बंगल्यावर धडकण्याचा प्लॅन फसला, कुणकुण लागताच पोलिसांनी केरे-पाटलांना उचललं
Maratha Reservation:मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
![Maratha Reservation: मराठा ठोक क्रांती मोर्चाचा फडणवीसांच्या बंगल्यावर धडकण्याचा प्लॅन फसला, कुणकुण लागताच पोलिसांनी केरे-पाटलांना उचललं Ramesh Kere Patil and bearer of Maratha Kranti Thok Morcha was detained by the mumbai police mumbai news Maratha Reservation: मराठा ठोक क्रांती मोर्चाचा फडणवीसांच्या बंगल्यावर धडकण्याचा प्लॅन फसला, कुणकुण लागताच पोलिसांनी केरे-पाटलांना उचललं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/50998a6711932899c845697ca9ffd2b91722924223570442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणावरुन विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत जबाब दो आंदोलन सुरू करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केले जाणार होते. रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले त्यावेळी त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” या नाऱ्याखाली आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होणार होते त्यानुसार मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी केरे पाटलांसाह अन्य आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांची गाडी गिरगाव चौराटी येथे अडवली. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते, मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते. याआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोनल केलं होतं.
तर आज देखील ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार होते, मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोणतीही परवानगी न घेता त्यांनी आंदोलन करत आहेत त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)