एक्स्प्लोर
नाना पाटेकरांच्या बाप्पाच्या दर्शनाला राज ठाकरे सहकुटुंब

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल अभिनेते नाना पाटकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. राज यांनी आपल्या कुटुंबियांसह बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांच्यासोबत मातोश्री कुंदाताई आणि मुलगा अमित हे नाना पाटेकर यांच्या माहीमच्या घरी गेले होते. त्याचवेळी अभिनेते महेश मांजरेकरही नानांच्या घरी आले. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या राज ठाकरे, महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर यांच्यात गप्पांची चांगलीच मैफल रंगल्याचं चित्रं होतं. ठाकरे-पाटेकर कुटंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कौटुंबिक स्नेह आहे. त्यामुळे यंदाही न चुकता राज यांनी नानांच्या घरी हजेरी लावली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























