अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग : संजय राऊत
Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे.
![अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग : संजय राऊत Raj Thackeray s letter to BJP on Andheri East by election is part of script Says Shivsena MP Sanjay Raut अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/735299e5e45dd30be0d8f204d38e8506166487376809625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Poll) माघार घेण्यासाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वतः पत्र लिहून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. तेव्हापासूनच भाजपच्या गोटात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर भाजपनं पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात बोलताना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे 'स्क्रिप्ट'चा भाग असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यावेळी मुंबई सत्र न्यायालय (Mumbai Sessions Court) परिसरात माध्यमांसोबत चर्चा करत असताना संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, " अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे 'स्क्रिप्ट'चाच भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळंच भाजपनं उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपानं उमेदवारी अर्ज मागे घेतला." तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती."
मुंबई सत्र न्यायालय परिसरात आजही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना संजय राऊतांनी थेट भाजप आणि राज ठाकरेंवर आरोप केले आहेत.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (MHADA) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत (Pravin Raut) यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)