एक्स्प्लोर
मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, उपनगरातही सरीवर सरी
मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. लालबाग, परळ, दादर, माहिम, वांद्रे या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे.

मुंबई: विजांच्या कडकडाटांसह मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. लालबाग, परळ, दादर, माहिम, वांद्रे या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. तर सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने काही काळ जोरदार बॅटिंग केली. दरम्यान सध्या पावसाने जोर धरला असला, तरी मुंबईतील रस्त्यावर सध्यातरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या नाहीत. मुंबईकरांनो, 8, 9 आणि 10 तारखेला गरज असेल तरच बाहेर पडा! उत्तर कोकण, म्हणजे मुंबई, रायगड आणि ठाणे या भागात 8, 9 आणि 10 जूनला अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे या तारखेला गरज असेल, तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या काही तासात दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तर तिकडे साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्येही मान्सूपूर्व सरींनी हजेरी लावली. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान मान्सून आज गोव्यात वर्दी देणार असल्याचं भाकित हवामान खात्यानं वर्तवलंय.त्यामुळे कोकणमार्गे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल अशी आशा आहे. हवामानाचा अंदाज नैऋत्य मोसमी पावसाचा उत्तरेकडील प्रवास सुरळीत सुरु आहे. मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण राज्यात मुसंडी मारली आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या काही तासात दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तर तिकडे साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्येही मान्सूपूर्व सरींनी हजेरी लावली. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान मान्सून आज गोव्यात वर्दी देणार असल्याचं भाकित हवामान खात्यानं वर्तवलंय.त्यामुळे कोकणमार्गे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल अशी आशा आहे. हवामानाचा अंदाज नैऋत्य मोसमी पावसाचा उत्तरेकडील प्रवास सुरळीत सुरु आहे. मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण राज्यात मुसंडी मारली आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























