एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Budget 2020 | अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला 7638 तर पश्चिम रेल्वेला 7042 कोटींचा निधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी 70 हजार कोंटीची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी 7638 कोटी तर पश्चिम रेल्वेला 7042 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खास मुंबई उपनगरीय विभागासाठी असलेल्या एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 550 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे. एमआरव्हीसी हे प्रकल्प राबवत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेल्या मध्य रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थासंकल्पात 7638 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच मुंबईला उत्तर भारताशी जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला 7042 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी 70 हजार कोंटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी काही हजार कोटी मुंबई उपनगरीय रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला देण्यात आला आहे. एमआरव्हीसी राबवत असलेल्या एमयूटीपी 2 साठी 200 कोटी , एमयूटीपी 3 करता 300 कोटी तर एमयूटीपी 3 मधील प्रकल्पांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवासी सुविधांमध्ये सरकते जिने-लिफ्ट उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एटीव्हीएम, लिफ्ट, एक्सलेटरची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.तर चर्चगेट-विरार ट्रॅक दुरुस्ती तसेच लोअर परेल वर्कशॉपमध्ये एलएचबी कोचचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकल्पाला किती निधी?
एमयूटीपी 2 - 200 कोटी
प्रकल्प -
सीएसएमटी-कुर्ला 5-6 मार्गिका
ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका
मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका
एमयूटीपी 3 - 300 कोटी
प्रकल्प -
47 वातानुकूलित लोकल गाड्या,
पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग,
ऐरोली ते कळवा लिंक रोड,
विरार ते डहाणू चौपदरीकरण,
एमयूटीपी 3 ए - 50 कोटी
प्रकल्प -
सीएसएमटी ते पनवेल एलिव्हेटेड मार्गिका
210 वातानुकूलित लोकल गाड्या,
पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग,
सीबीटीसी सिग्नल यंत्रणा
सीवूड्स-बेलापूर-उरणसाठी 100 कोटी
सीवूड्स -बेलापूर-उरण या रखडलेल्या मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला गती मिळेल.
मध्य रेल्वेला कोणत्या कामासाठी किती निधी?
या अर्थसंकल्पात 7 हजार 638 कोटींचा निधी तरतूद करण्यात आली आहे. एटीव्हीएमची संख्या वाढवण्यासाठी 1 कोटी 638, एटीव्हीएम बदलण्यासाठी 2 कोटी, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याकरिता 4 कोटी, पनवेल-कळंबोली कोचिंग डेपोकरिता 8 कोटी, कर्जत-पळसदरी दरम्यान चौथी लाईन आणि कर्जत-पनवेल यार्ड रिमॉडलिंगकरिता 3 कोटी, विविध स्थानकात रोड ओव्हर ब्रीज उभारण्यासाठी 351 कोटी, पुलांचे काम-बोगद्याकरिता 98 कोटी, वर्कशॉपकरता 331 कोटी, प्रवासी सुविधेकरता 295.6 कोटी, सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता 9.3 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
पश्चिम रेल्वेला कोणत्या कामासाठी किती निधी?
पश्चिम रेल्वेला 7042 कोटी रुपयांचा आर्थिक निधी देण्यात आला आहे. नवीन रेल्वे लाईन, गेज रुपांतर, दुहेरीकरणाकरिता 1 हजार 402 कोटी, प्लॅटफॉर्मची उंची, अतिरिक्त पिट लाईन, वेग वाढवणे आणि यार्ड रिमॉडिलिंगच्या कामाकरता 50.58 कोटी रुपये, रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमची संख्या वाढवण्याकरता 6.79 कोटी, रोड ओव्हर ब्रीजकरता 509.4 कोटी, रोड सुरक्षेच्या विविध कामासाठी 901.40 कोटी, विविध प्रवासी सुविधेसाठी 279.70 कोटी, सिग्नल यंत्रणा आणि इतर इलेक्ट्रिक कामे पूर्ण करण्यासाठी 178.59 कोटी, चर्चगेट ते विरार दरम्यानचे रेल्वे रुळ बदलण्यासाठी 37.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मुंबई- अहमदाबाद मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे. नवी दिल्ली-मुंबई दरम्यान वेग वाढवून प्रवास वेळ 12 तासांवर आणणे या कामांचा समावेश आहे. प्रवासी सुविधेंतर्गत पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये 16.06 कोटी रुपयांचे पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement