"देश को PM आवास नहीं, सास चाहिए", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
देशभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे. लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात अनेक लोक ऑक्सिजनसाठी इथेतिथे भटकत आहेत. मात्र दुसरीकडे नव्या पंतप्रधान निवासस्थानाचं बांधकाम सुरु झालं आहे. यावरुन राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. पहिल्या चित्रात काही लोक ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. त्याच वेळी, दुसरे चित्र दिल्लीच्या इंडिया गेट जवळील आहे, जिथे खोदकाम सुरु आहे. ट्विटरवर छायाचित्रे शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, "देश को PM आवास नहीं, सास चाहिए."
देश को PM आवास नहीं, सांस चाहिए! pic.twitter.com/jvTkm7diBm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2021
यापूर्वी राहुल गांधींनी कोरोना संक्रमित रुग्णांना पुरेसं ऑक्सिजन देण्याचे आवाहन केले होते. कोरोना रुग्णांना वाचवण्याची काही सूचनाही त्यांनी केल्या होत्या. एका ट्वीटच्या माध्यमातून ते म्हणाले होते की, "देशवासियांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लस देणे महत्वाचे आहे. योग्य आकडेवारी आणि नवीन कोरोना स्ट्रेनचं विश्लेषण, दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करणे." केंद्र सरकारवर निशाणा साधतांना त्यांनी म्हटलं होतं की, "दुर्दैवाने केंद्र सरकार हे करू शकणार नाही हे सिद्ध करत आहे."
The Movid pandemic. pic.twitter.com/oRSm7DJRpX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2021
राहुल गांधींनी काल ट्विटरवर एक कोरोना आलेख शेअर केला आणि लिहिलं 'The Movid Pandemic.' या आलेखाच्या माध्यमातून राहुल गांधींनी सांगितलं की, कोरोनाची कशी झपाट्याने वाढ होत आहे. राहुल यांनीही केंद्राकडे संपूर्ण लॉकडाऊनची मागणीही केली होती. त्यांनी लिहिले, "गेल्या वर्षीचा अनियोजित लॉकडाऊन लोकांवर प्राणघातक हल्ला होता, त्यामुळे मी संपूर्ण लॉकडाऊन विरोधात आहे. मात्र पंतप्रधानांचे अपयश आणि केंद्र सरकारची शून्य रणनीती देशाला संपूर्ण लॉकडाऊनकडे ढकलत आहे. अशा परिस्थितीत गरीबांना आर्थिक पॅकेज आणि त्वरित सर्व प्रकारच्या मदतीची गरज आहे. "
इतर महत्त्वाच्या बातम्या























