एक्स्प्लोर

Corona Vaccination: राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण, राज्याला मिळाले 9 लाख 63 हजार डोसेस

कोवीन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी 17 हजार 749 व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे 9 लाख 63 हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर 7 लाख 84 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून आज मंगळवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात 3 हजार 135 शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे. 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

कोवीन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी 17 हजार 749 व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 12 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.

3 हजार 135 शितसाखळी केंद्र

राज्यात शितगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महानगरपालिकास्तरावर 27, असे शितगृह तयार असून 3 हजार 135 शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉकइन कुलर - 21, वॉक इन फ्रिजर -4, आय एल.आर. 4153, डिप फ्रीजर- 3937 आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 1200 व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीयस्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

511 केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये 119 ग्रामीण रुग्णालय, 83 उपजिल्हा रुग्णालय, 69 वैद्यकीय महाविद्यालय, 59 नागरी आरोग्य केंद्र, 43 महापालिका रुग्णालय, 23 प्राथमिक आरोग्य केंद्र, 23 खासगी रुग्णालय, 22 जिल्हा रुग्णालय, 22 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 सामान्य रुग्णालय, 7 महापालिका रुग्णालय, 4 महिला रुग्णालय अशाप्रकारे 511 लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget