एक्स्प्लोर

Swikriti Sharma : ठाकरेंकडून विधानसभा लढलेल्या प्रदीप शर्मांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन

Pradeep Sharma : वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या (Pradeep Sharma) नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा (Swikriti Sharma) या राजकारणात प्रवेश करणार असून मलबार हिल परिसरात त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वीकृती शर्मा यांच्या ताफ्यात 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्सचा समावेश आहे. 

मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ॲंटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. कार्यकर्त्यांसह त्यांच्या गाड्यांचा ताफा मलबार हिलमध्ये पोहोचल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. 

अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?

प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट हे निश्चित असल्याचं सांगितलं जातंय. मात्र स्वीकृती शर्मा या नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. 

अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा जामिनावर बाहेर

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.

लखन भैय्या प्रकरणात प्रदीप शर्मांना दिलासा

लखन भैया कथिक एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्च 2024 रोजी मोठा निर्णय देत प्रदीप शर्मा यांना दणका दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची दोष मुक्ती रद्द करत दोषी आढळल्याचं सांगत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Embed widget