एक्स्प्लोर

विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री, गुरुदास कामत यांचा प्रवास

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला एक सर्वसामान्य तरुण देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो.... असा राजकीय क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा गुरुदास कामत यांचा प्रवास आहे.

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात गुरुदास कामत यांनी अखेरचा श्वास घेतला. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असलेले गुरुदास कामत, यांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला एक सर्वसामान्य तरुण देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो.... असा राजकीय क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा गुरुदास कामत यांचा प्रवास आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समित्यांवरील पदं भूषवली, राजकीय क्षेत्रातही मोठ-मोठ्या जाबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास: 1980 मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मग 1987 मध्ये त्यांची भारतीय यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. गुरुदास कामत हे 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2008 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं. - 1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश - 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती - 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर - पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व - 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम - केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार - 2014  मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव गुरुदास कामत यांचा शैक्षणिक प्रवास गुरुदास कामत यांचं शालेय शिक्षण कुर्ल्यातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कॉमर्स शाखेसाठी माटुंग्यातील पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शिक्षणात अत्यंत हुशार विद्यार्थी होते. 1996 साली पोतदार कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा ‘प्रो. वेलिंगकर ट्रॉफी’ पुरस्कार देण्यात आला होता. पोद्दार कॉलेजमध्ये असताना ते बॅडमिंटन टीमचे नेतृत्त्व करत, तसेच जिमखान्याचे सेक्रेटरीही होते. 1975-76 साली गुरुदास कामत यांची पोतदार कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी थेट निवड झाली होती. त्यानंतर गुरुदास कामत यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये प्रवेश घेतला. तिथेही ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिले. गव्हर्नमेंट लॉ कॉलजच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून, मुंबई विद्यापीठात द्वितीय आले होते. समित्यांवरील भूषवलेली पदे : 1984 – 1989 – सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय 1987 - 1989 – सदस्य, रेल्वे बिलासंबंधित संयुक्त समिती 1991 – 1996 सदस्य, औद्योगिक समिती सदस्य, रेल्वे संमेलन समिती सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय 1998 – 1999 सदस्य, याचिका समिती सदस्य, पेट्रोलियम आणि केमिकल समिती सदस्य, सल्लागार समिती, अर्थ मंत्रालय 2004 - 2009 अध्यक्ष. ऊर्जेवरील स्थायी समिती सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम अँड नॅशरल गॅस मंत्रालय सदस्य, अधिकृत भाषा समिती सदस्य, अर्थ समिती 2005 – 2009 सदस्य, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget