एक्स्प्लोर

अनिल परबांविरोधात हायकोर्टात याचिका; तुमची राजकीय लढाई न्यायालयात नको, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारले

निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी आपल्या वरिष्ठांकडे या कथित भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे.

मुंबई : तुमची राजकीय लढाई न्यायालयात लढू नका, असे खडेबोल सुनावत हायकोर्टानं नाशिक आरटीओतील भ्रष्टाचारासंदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास बुधवारी नकार दिला आहे. राज्य परिवहन कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निलंबित मोटार वाहन निरीक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. 

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरटीओमधील बदल्या आणि पोस्टिंगमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत ही याचिका अॅड. व्ही पी राणे यांच्यामार्फत दाखल केली आहे. गजेंद्र पाटील यांनी आपल्या वरिष्ठांकडे या कथित भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. तसेच नाशिकच्या सीमेवरील चौक्यांवरही भ्रष्टाचार होत असून, खासगी ऑपरेटरविरोधातील खटले थेट निकाली काढले जातात आणि बीएस - 4 वाहनांची बेकायदेशीर नोंदणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेतून केला आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, या भ्रष्टाचाराची स्वतंत्रपणे केंद्रीय तपास संस्थांमार्फत अथवा सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. मात्र यावर तातडीनं सुनावणी घेण्यासारखं काय आहे? असा सवाल करत तुमची राजकीय लढाई न्यायालयात आणू नका, असं सुनावत याचिकाकर्त्यांना फैलावर हायकोर्टानं तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी 8 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
Embed widget