एक्स्प्लोर
Advertisement
राणीच्या बागेत पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म
मुंबईच्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनने पिल्लाला जन्म दिला.
मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या कुटुंबातून स्वातंत्र्यदिनीच गोड बातमी आली आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनने पिल्लाला जन्म दिला.
राणीच्या बागेत पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने जुलै महिन्यात अंडं दिलं होतं. फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.
15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी अंड्यातून पिल्लू बाहेर आलं. डॉ. संजय त्रिपाठी आणि त्यांची टीम या पिल्लाचं वजन, पोषण याबाबत काळजी घेणार आहे.
सर्वात कमी वयाचा असलेला हंबोल्ट पेंग्विन मिस्टर मॉल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांचं हे पिल्लू आहे.
अंडं दिल्यानंतर साधारण 40 दिवसांनी पिल्लाचा जन्म झाला.
राणीच्या बागेतले सात पेंग्विन गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या वातावरणात चांगलेच रुळले. मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा पेंग्विनच्या प्रजननाचा काळ असतो.We have some great news coming in from Rajmata Jijamaya Udyaan (Byculla Zoo)! Our ???? parents have delivered a freedom baby! The parents and the chic are doing well. My congratulations to all those involved in this process, especially Dr. Tripathi & his team and Sudhir Naik ji!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement