एक्स्प्लोर

मुंबईत दीड महिन्याच्या बालकांना आजपासून देण्यात येणार पीसीव्ही लस, काय आहेत फायदे?

मुंबई महापालिका क्षेत्रात आज 13 जुलै पासून दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ देण्‍यास सुरूवात करण्‍यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात आज 13 जुलै पासून दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास सुरूवात करण्‍यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मनपा आरोग्‍य केंद्रांमध्ये व रूग्‍णालयांमध्‍ये असणा-या आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते साधारणपणे दुपारी 1 या कालावधी दरम्यान ही लस मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
 
राज्‍य शासनाच्‍या निर्देशांनुसार 13 जुलै पासून सुरु करण्यात येत असलेल्या पीसीव्ही लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दीड महिन्याच्या बालकांना लशीची पहिली मात्रा (डोस) देण्यात येणार आहे. हे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 208 ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर लसीकरणाच्‍या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्‍यात आले असुन क्षेत्रीय स्‍तरावर या लसीकरणाबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्री इत्यादींच्या वितरणाची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याव्‍दारे देण्‍यात आली आहे.
 
विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार सदर लसीकरण मोहिमेत ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) या लशीचा अंतर्भाव करण्यात आल्याने बालकांना ‘न्युमोकोकल न्युमोनिया’ आणि इतर ‘न्युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण मिळु शकणार आहे.
 
भारतात सन 2010 मध्ये ‘न्युमोकोकल’ या आजाराने पाच वर्षाखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात 5 ते 6 लाख बालकांना ‘न्युमोनिया’ हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. ‘स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया’ या जीवाणूमुळे ‘न्युमोकोकल’ हा संसर्गजन्य आजार होतो हा आजार म्‍हणजे फुप्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWarkari Accident : Kalyan : पंढरीकडे निघालेल्या कल्याणमधील वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घालाChhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP MajhaKonkan Railway | कोकण रेल्वे ठप्प! आज कोणकोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे!  आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Embed widget