एक्स्प्लोर

पत्राचाळ प्रकरणाची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब; गुरूआशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का? सत्र न्यायालयाचा सवाल

Patra Chawl Scam Case: पत्राचाळ प्रकरणाची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब, संजय राऊतांना तूर्तास दिलासा गुरूआशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का? सत्र न्यायालयाचा सवाल

Patra Chawl Scam Case: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची (Patra Chawl Scam Case) सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशातच आता याप्रकरणाची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले होते. परंतु, गुरूआशिष या आरोपी बनवण्यात आलेल्या कंपनीच्यावतीनं कोणीही कोर्टात हजर करण्यात आलं नव्हतं. यावरुन मुंबई सत्र न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. गुरू आशिषबाबत एनसीएलटीचा निकाल येईपर्यंत खटला थांबवून ठेवायचा का? असा सवाल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं मंगळवारी उपस्थित केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित गोरेगाव, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील खटला सध्या न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुरू आहे. यात ईडीनं आरोपींच्या यादीत आरोपी क्रमांक 4 बनवलेल्या गुरूआशिष या कंस्ट्रक्शन कंपनीची जबाबदारी अद्याप कुणीही घेण्यास तयार नसल्याचं चित्र कायम आहे. 

कंपनी बुडीत निघाल्याच्या प्रकरणाची सुनावणी सध्या लवादापुढे सुरू असून त्याचा निकाल प्रलंबित आहे. तसेच कंपनीच्या माजी संचालकांनी याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानं आपले हात आधीच वर केले आहेत. त्यामुळे सध्या 'गुरूआशिष' साठी कुणीच वाली न उरल्यानं आरोपनिश्चितीची प्रक्रिया अडकून पडली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणील खटल्याच्या नियमित सुनावणी करता मंगळवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर होते. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुरू असलेला हा खटला सध्या आरोपनिश्चितीच्या टप्यावर आहे. मात्र जोपर्यंत सर्व आरोपी कोर्टापुढे हजर होत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. एनसीएलटीच्या भूमिकेची नोंद घेत तूर्तास मुंबई सत्र न्यायालयानं खटल्याची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब केली आहे.

कथित पत्राचाळ घोटाळा आणि गुरूआशिषचा सहभाग 

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाकडनं मिळालेला एफएसआय विकून मनी लाँड्रींग करण्याच्या हेतूनंच प्रवीण राऊत यांनी हे सारे घोटाळे केल्याचा तपासयंत्रणांचा आरोप आहे. प्रवीण राऊत आणि वाधवान यांनी गुरूआशिष आणि एचडीआयएलच्या माध्यमातून 1 हजार 34 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. या पुनर्विकास प्रकल्पात घर गमावलेल्या 672 लोकांना घरं देण्याचा यांचा कधीही हेतूच नव्हता, असं प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याची माहिती ईडीनं दिली आहे. 

गुरूआशिषच्या माध्यमातून प्रवीण राऊत एफएसआय लाटण्याच्या हेतूनच बांधकामाची जागा 1 लाख 66 चौ.मी. वरून वाढवत 1 लाख 94 चौ.मी. दाखवली. त्यावेळी पत्राचाळ मालक आणि जागेचे मालक असलेलं म्हाडा यांनी लोखंडवालासोबत पुनर्विकासाचा करार केला होता, जो कालांतरानं फिस्कटला. त्यानंतर निपूण ठक्करनं प्रवीण राऊतच्या मदतीनं गुरूआशिष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हा पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेतला. कालांतरानं पुढे वाधवान यांच्या एचडीआयएलनं गुरूआशिषवर ताबा मिळवला ज्यात प्रवीण राऊत यांची 25 टक्के भागीदारी होती. साल 2010 ते 14 दरम्यान गुरूआशिषनं हा एफएसआय बाहेरच्याबाहेर विकून 1 हजार 40 कोटी मिळवले. मात्र हा पैसा पत्रा चाळवासियांची घर बांधण्यात  वापरण्याऐवजी एचडीआयएलच्या माध्यमातून इतर कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप ईडीनं या आरोपपत्रातून केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget