एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Building Collapsed : घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळला, इमारतीत दोन जण अडकल्याची भीती

Ghatkopar Building Collapsed : मुंबईतील घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Vidyavihar Building Collapsed : मुंबईतील घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील इमारतीचा भाग कोसळला. दुर्घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती असून त्यांचा शोध सुरु आहे.

विद्याविहार येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळला

मुंबईच्या विद्याविहार येथील जुन्या दुमजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळो धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाहा व्हिडीओ : विद्याविहार येथील 40 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

माजी शिक्षण मंत्री आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'विद्याविहारमध्ये इमारत कोसळली असून त्यात दोन जण अडकले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, नालेसफाई झालेली नाही. मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई महानगरपालिकेने काळजी घ्यायला हवी. पहिल्या पावसातच हे चित्र आहे. पावसाच्या आधीच मुंबई मनपाची तयारी व्हायला हवी होती. लोकांच्या जीवाशी खेळ व्हायला नको.'

वर्षा गायकवाड यांची दुर्घटनास्थळी पाहणी

वर्षा गायकवाड यांनी पुढे त्यांनी सांगितलं की, 'गोवंडीत दोन नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या कामासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. मिलन सबवे पहिलं पण अंधेरी सब वे आणि इतर ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. अशा दुर्घटना होऊ नये म्हणून काम करायला पाहिजे. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. पण प्रशासक आहेत, कारवाई झाली पाहिजे.'

वसईमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला

वसईमध्येही इमारतीचा काही भाग कोसळला आहे. वसईमधील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वसईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका जर्जर इमारतीचा सज्जा कोसळला आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू ही झाला नाही तरी जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP MajhaJob Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरतीDombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget