Parambir Singh Exclusive : परमबीरांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये
Parambir Singh Case Update : परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये ही चोरीला गेलेली फाईल आढळून आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
![Parambir Singh Exclusive : परमबीरांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये Parambir Singh Case Updates Confidential file ofHome Ministry appeard in Sanjay Punamiya mobile abpaj Parambir Singh Exclusive : परमबीरांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/18/7ae9193cd6bfd84742c8ac6d4b7bc8ba_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या परमबीर सिंह यांचे पाय खोलात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. गृहमंत्रालयातील एक अत्यंत गोपनीय फाईल चोरीला गेली असून ती परमबीरांचे निकटवर्तीय असलेल्या संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये आढळली आहे. परमबीर सिंहांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी संजय पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील गृहविभाग आणि केंद्रीय तपास सस्थांमधील गोपनीय पत्रव्यवहार खाजगी व्यक्तीच्या कस्टडीत कसा गेला असा सवाल विचारला जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या कारवाई संदर्भातील गृहविभागातील ही फाईल असल्याची माहिती समोर आली आहे. परमबिर सिंह यांचे मानले जाणारे निकवर्तीय संजय पुनामिया आणि इतर आरोपींच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पुनामिया यांच्या मोबाईल मध्ये 27 पानांची ही फाईल मिळाली आहे. ही फाईल गोपनीय असल्याने कोणत्या ही विभागाकडे किंवा माहितीच्या अधिकारात दिली नसताना पुनामिया यांच्याकडे कशी आली? संजय पुनामिया यांनी ही 27पानांची फाईल त्यांचा मुलगा सनी पुनामिया याला मोबाईलवरुन पाठवल्याच प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
आज ठाण्यात हजेरी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज ठाण्यात नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. 234 दिवसांनंतर परमबीर सिंह काल (गुरुवारी) मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झालेत. धमकी देऊन साडे तीन कोटींची खंडणी उकळल्याचा परमबीर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)