एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबईत कोरोना व्हायरसच्या नावाखाली ऑनलाईन फ्रॉड

मुंबईत एका मोठ्या हॉटेलच्या नावाने जाहिरात देऊन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे कोरोनाच्या नावाखाली ही जाहिरात देण्यात आली होती.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे गुन्हेगारी कमी झाली असली तरी ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. मुंबईत असाच एक प्रकार 14 वर्षाच्या भाविक जगदाळे याच्या प्रसंगावधानाने समोर आलाय. एका मोठ्या हॉटेलच्या नावाने एक जाहिरात देण्यात आली होती. यात स्वस्तात घरपोच काही गोष्टी देण्याचा दावा करण्यात आला होता. भाविक आपल्या आईवडिलांसोबत नेहमी या हॉटेलात जात असल्याने त्याला या जाहिरातीबद्दल शंका आली. त्याने याची माहिती आपल्या आईला दिली अन् या जाहिरातीचा भांडाफोड झाला. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढल्याचे समोर येत आहे. मुंबईतही अशाच प्रकारे एक फ्रॉड समोर आलाय. भाविकने आपल्या आईला याबद्दल याची माहिती दिल्यानंतर उन्नती जगदाळे यांनी फोन करुन या ऑफरबद्दल विचारणा केली. त्यावर कोरोनामुळे आम्ही स्वस्तात गोष्टी देत असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. त्यावर उन्नती यांनी अधिक चौकशी केली असता या वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल ज्यात तुम्हाला बँकेची माहिती द्यावी लागेल असे सांगण्यात आले. फोनवरुन अश्लिल बोलणं फोनवर बोलणे झाल्यानंतर उन्नती यांनी या ऑफरच्या चौकशीसाठी हॉटेलमध्ये फोन लावला तर काही दिवसांपासून हॉटेल बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उन्नती यांनी पुन्हा फोन केल्याने समोरच्या व्यक्तीला याची शंका आली. त्यानंतर उन्नती यांच्यासोबत तो अश्लिल बोलायला सुरुवात केली. सध्या लॉकडाऊन असल्याने उन्नती जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात जाता आले नाही. मात्र, त्या ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार ऑनलाईन फ्रॉडपासून दूर राहा कोरोना व्हायरसमध्ये अनेक लोकांचे हाल होत आहे. ज्यांचे हातावर पोट होते असे अनेकजण आज रस्त्यावर आलेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी पुढाकार घेत त्यांना मदत सुरू केलीय. मात्र, या ऑनलाईन मदतीच्या माध्यामातून फ्रॉड होत असल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाई पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती केली जात आहे. सरकारी जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे ज्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. अशा लोकांना नक्कीच मदत करायला हवी. मात्र, कोणालाही मदत करताना त्याची शहानिशा केल्याशिवाय मदत करू नका. कारण, तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. Cyber Crime | कोरोनाच्या दहशतीत सायबर घोटाळ्याची भर; बँक डिटेल्स मागवून फसवणुकीचा प्रकार

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget