एक्स्प्लोर
बोरीवलीत फटकामार गँगमधील एकाला अटक
बोरीवली जीआरपी पोलिसांनी फटकामार गँगमधील एका सदस्याला अटक केली आहे. हा चोर गोरेगाव आणि राममंदिर रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या सिग्नलजवळ बसून प्रवाशांवर हल्ला करायचा.
मुंबई : बोरीवली जीआरपी पोलिसांनी फटकामार गँगमधील एका सदस्याला अटक केली आहे. फटकामार गँगचा हा सदस्य गोरेगाव आणि राममंदिर रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या सिग्नलजवळ लोखंडी रॉड घेऊन बसायचा. रेल्वेतील जे प्रवासी मोबाईल हतात घेऊन रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहतात, अशा प्रवाशांच्या हातावर फटका मारुन त्यांचा मोबाईल घेऊन पळून जात होता.
बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, तक्रारदार शक्ती मोहन पिल्ले 24 जून रोजी 9.45 च्या लोकलने मालाडहून अंधेरीला जात होते. गोरेगाव स्टेशन सोडून पुढे जाताना सिग्नलजवळ रॉड घेऊन बसलेल्या आरोपीने शक्ती पिल्लेंवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते खाली पडले. खाली पडल्यावर आरोपीने शक्ती पिल्लेंवर दगडाने हल्ला केला आणि मोबाईल घेऊन गोरेगाव पूर्वकडे पळाला.
यादरम्यान, जवळच उभा असलेला एक मुलगा हे सर्व पाहात होता. रेल्वे पटरीवर पडलेल्या पिल्ले यांच्या अंगावरुन रेल्वे जाणार, याआधीच त्याने पिल्ले यांना पटरीपासून दूर नेले आणि त्यांचे प्राण वाचवले.
पिल्ले यांच्या तक्रारीनंतर सीसीटीव्हीच्या आधारे मंगळवारी संध्याकाळी आरोपी दीपक भोडकरला अटक केली आहे. तो गोरेगाव पश्चिमेकडील जवाहरनगर येथे राहणारा आहे.
पोलिसांनी आरोपीकडून 10 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. दीपक भोडकरवर रेल्वे पोलिसांत 15 गुन्ह्यांची नोंद आहे. तर सिटी पोलिसांतही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दीपक भोडकरची एक मोठी गँग आहे. ही गँग मोबाईल चोरी करणे, त्यांचे आयएमइआय नंबर बदलणे आणि ते मोबाईल परत बाजारात विकण्याचे काम करते. पोलीस सध्या भोडकरच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement