एक्स्प्लोर
Advertisement
आंब्यांच्या खोक्यात 98 लाखांच्या जुन्या नोटांचं घबाड
प्रितेश नामक व्यापारी मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा घेऊन मुंब्रा परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-एकला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुंब्रा परिसरात सापळा रचून प्रितेशला अटक केली.
ठाणे : नोटाबंदीनंतर बंद झालेल्या जुन्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांचं मोठं घबाड ठाणे गुन्हे शाखेच्या हाती लागलं आहे. या नोटा घेऊन जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 98 लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्या.
प्रितेश छाडवा असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो मुंबईच्या चेंबूर परिसरात राहणारा आहे. प्रितेश हा मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा घेऊन मुंब्रा परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-एकला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुंब्रा परिसरात सापळा रचून प्रितेशला अटक केली.
प्रितेशच्या गाडीच्या डिक्कीत पोलिसांना आंब्याचे दोन बॉक्स सापडले, ज्यात एक हजार रुपयांच्या 4 हजार 250 नोटा आणि 500 रुपयांच्या 11 हजार 100 नोटा सापडल्या. या नोटांची किंमत तब्बल 98 लाख इतकी आहे. या नोटा बदलण्यासाठी आणल्याचं प्रितेशनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या सगळ्या नोटा जप्त केल्या असून प्रितेश यालाही अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement