एक्स्प्लोर
Advertisement
प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन
जैत रे जैत, घर, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या सिनेमांमधील गाण्यांमध्येही उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा वापर झाला आहे.
मुंबई : प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दीड महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान उल्हास बापट आजारी पडले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यावेळी तिथेच महिनाभर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना 16 डिसेंबरला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंडित उल्हास बापट यांचा जन्म 31 ऑगस्ट 1950 रोजी झाला होता. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त गणेश बापट हे प्रसिद्ध गायक होते. त्यामुळे घरातच संगीताचा वारसा होता. उल्हास बापट यांचाही संगीताकडे असलेला कल पाहून, वडिलांनी त्यांनी पंडित रमाकांत म्हापसेकरांकडे तबल्याच्या शिक्षणासाठी पाठवले. पुढे त्यांनी झरीन दारुवाला यांच्या मार्गदर्शनात सरोद वादनही शिकून घेतले.
संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सहवासात आलेल्या उल्हास बापट यांना संतूर या वाद्यात रस असल्याचं कळलं आणि त्यांनी या वाद्यात प्रावीण्य मिळवण्याचे प्रयत्न केले.
1975 मध्ये पहिल्यांदा त्यांनी संतूर वादन सादर केले. पंडित रविशंकर यांच्या मुंबईतील ‘संचरिणी’ या खासगी बैठकीत त्यांनी हे सादरीकरण केले होते.
जगातील सर्वोत्कृष्ट संतूरवादकांमध्ये उल्हास बापट यांचं नाव घेतलं जातं. संतूरच्या तारा जुळवण्यासाठी ‘क्रोमॅटिक सिस्टिम’ या पद्धतीचा वापर करणारे, ते एकमेव संतूरवादक होते. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या संतूरवादनाचे कार्यक्रम झाले आहेत.
संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे एकूण दोन अल्बम त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. पंडित नारायण मणी यांच्यासोबत उल्हास बापटांनी हे अल्बम ध्वनिमुद्रित केले होते.
जैत रे जैत, घर, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या सिनेमांमधील गाण्यांमध्येही उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा वापर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement