जावेद अख्तरांना 'ते' वक्तव्य महागात? मुंबईतील मुलुंडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल
Non-Cognisable Complaint Against Javed Akhtar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non-Cognisable Complaint Against lyricist Javed Akhtar : Mumbai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (Non Cognizable Offence) गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष दुबे या वकिलाच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. याबाबत मुलुंड परिसरात राहणारे वकील संतोष दुबे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र अनेक दिवसांनंतर देखील अख्तर यांनी माफी न मागितल्याने काल वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "स्थानिक प्रवक्ते संतोष दुबे यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेनुसार, कमल 500 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
जावेद अख्तर यांना आरएसएस विरोधात चुकीचं आणि अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी वकिलांकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा आरोप केला जातोय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा तक्रारदारांनी आरोप केला आहे. याबाबत मुलुंड परिसरात राहणारे वकील संतोष दुबे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र अनेक दिवसांनंतर देखील अख्तर यांनी माफी न मागितल्याने सोमवारी वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
