एक्स्प्लोर
निवडणुकीतल्या घोषणा शिवसेना विसरली, मालमत्ता करात सवलत नाही !

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, अर्थसंकल्पात मालमत्ता करात कोणतीही सवलत जाहीर करण्यात आली नाही.
शिवसेनेच्या निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर 500 ते 700 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करांत सवलत देण्याचं जाहीर केलं होते. मात्र, शिवसेनेची मालमत्ता करमाफीची घोषणा हवेतच विरली आहे.
मुंबईतील झोपडपट्ट्यांवरही मालमत्ता कर लावण्याचे महापालिका बजेटमध्ये प्रस्तावित आहे. यामुळे 250 कोटींचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. मात्र, झोपडपट्टीवर कर लावण्यास भाजपसह सर्व विरोधकांचा विरोध आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते, मुंबई महापालिकेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर मालमत्ता करात सवलत देण्यात येईल. मात्र, प्रत्यक्ष अर्थसंकल्पात तशी कोणतीही घोषणा पाहायला मिळाली नाही. उलट झोपडपट्ट्यांवरही मालमत्ता कर लावण्याचे प्रस्तावित आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेचा 2017-18साठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटीची घट करण्यात आली आहे. यंदा 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटींची घट झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
