एक्स्प्लोर

बीएमसी प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब

Mumbai BMC Election News: बीएमसी प्रभाग संख्या आणि पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'. पुढील सुनावणीपर्यंत यावर कोणताही निर्णय घेणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात हमी.

Mumbai BMC Election News: मुंबई महापालिकेच्या (Mumbai Mahanagarpalika) प्रभाग रचनेबाबत तूर्तास परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्यात आली असून 3 जानेवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही, अशी हमी राज्य सरकारच्यावतीन (Maharashtra Government) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. याची नोंद घेत न्यायमीर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं याचिकेवरील सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी दाखल केलेली याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्याचं हायकोक्टानं मान्य केलं आहे. या याचिकेवर 20 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचं न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए.एस. डॉक्टर यांच्या खंडपीठानं मान्य केलं होतं. मात्र काही कारणास्तव हे प्रकरण सुनावणीसाठी बोर्डावर न लागल्यानं याचिकाकर्त्यांनी यावर तातडीच्या सुनावणीची न्यायमूर्ती नितीन जामदारांपुढे विनंती केली होती.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं आपल्या काळात घेतलेला वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत येताच रद्दबातल केला. याविरोधात माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. महापालिका प्रभागांची संख्या 227 वरुन 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. या निर्णयावर शासकीय अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय बदलला आणि  पुन्हा महापालिकेची प्रभाग संख्या 227 ठेवण्याचा निर्णय जारी करत तसा कायदाच केला. ज्याला राजू पेडणेकर यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्यावतीनं विक्रम नानकानी यांनी हायकोर्टाला सांगितलं की पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही प्रकारे या निर्णयावर कार्यवाही करण्यात येणार नाही. 

महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला 236 प्रभागांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला होता. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर तो बदलण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय बदलून एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमानच केला आहे असा आरोपही याचिकादाराच्यावतीनं करण्यात आला आहे. तर महापालिकेची प्रभाग संख्या 9 वाढवून 236 करण्यासाठी अधिकृत जनगणना होणं आवश्यक आहे, ही जनगणना तत्कालीन सरकारनं केली नाही, त्यामुळे संबंधित निर्णय रद्दबातल करण्यात येत आहे असा दावा शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लक्षात ठेवा देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल, शिक्षा नक्की मिळेल; 'मतचोरी' हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर तो संविधान आणि लोकशाहीविरुद्ध मोठा घोटाळा, राहुल गांधींचा गर्भित इशारा
Video: लक्षात ठेवा देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल, शिक्षा नक्की मिळेल; 'मतचोरी' हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर तो संविधान आणि लोकशाहीविरुद्ध मोठा घोटाळा, राहुल गांधींचा गर्भित इशारा
Nagpur Crime : वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लक्षात ठेवा देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल, शिक्षा नक्की मिळेल; 'मतचोरी' हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर तो संविधान आणि लोकशाहीविरुद्ध मोठा घोटाळा, राहुल गांधींचा गर्भित इशारा
Video: लक्षात ठेवा देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल, शिक्षा नक्की मिळेल; 'मतचोरी' हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर तो संविधान आणि लोकशाहीविरुद्ध मोठा घोटाळा, राहुल गांधींचा गर्भित इशारा
Nagpur Crime : वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
US-Pak : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
Australia : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
Embed widget