एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘टक्केवारीनं मुंबईचा घात केला’, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप
मुंबई: ‘मुंबईच्या सत्ताधीश नेत्यांना मुंबईच्या विकासाशी काही घेणदेणं नाही. फक्त टक्क्यावर यांचं काम अडलं आहे. या टक्क्यानंच घात केला आहे. ’ असा आरोप केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केल. पार्ल्यामध्ये आयोजित प्रचारसभेत गडकरी बोलत होते.
‘पैसा कमावणं हा काही गुन्हा नाही पण राजकारण हा पैसे कमावण्याचा मार्ग नाही. मी फोकनाड नाही, नुसती घोषणा करत नाही तर कामं पण करतो.’ असंही गडकरींनी ठणकावून सांगितलं.
निवडणुकीत फक्त भावनात्मक भाषणांवर मतं देणार का? असा सवाल करत गडकरींनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. 'सोनिया गांधींना गरीबांची चिंता नाही. राहुल गांधींना रोजगार कसा मिळणार ही त्यांना चिंता आहे.'
'जोवर टक्के घेणाऱ्यांना हाकलत नाही तोवर मुंबईचं चित्र सुधारणार नाही. शिवसेनेनं पारदर्शी कारभार केला असेल तर तसं त्यांनी शपथेवर सांगावं. असंही गडकरी म्हणाले.
संबंधित बातम्या:
‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल: उद्धव ठाकरे
‘सामना’वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक
हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट
…म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement