एक्स्प्लोर
कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई : ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून किरीट सोमय्या, राम कदम यांनी दखल घेतली. मात्र यावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी थेट कपिल शर्माचा मुखवटा घालून सर्व प्रकरणावर तिरकस टोला लगावला आहे.
कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री
कपिल शर्माच्या ट्वीटची लगेच दखल घेतली जाते. पण मी गेल्या अनेक वर्षांपासून हाच मुद्दा उचलत असूनही याकडे लक्ष दिलं जातं नाही, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. नितेश राणेंनी व्हिडीओ शेअर करुन उपहासात्मक टोला लगावला आहे.बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा
या व्हिडीओत राणे म्हणाले की, "मी एक मुंबईकर, आज सकाळीच ऐकलं, की असा चेहरा असलेल्या माणसाचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवलात. मीही मुंबई महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचार, खड्ड्यांवर पडलेले रस्ते, नालेसफाई, पाणी चोरी आणि अशा असंख्या प्रश्नांबद्दल आपल्याला पत्र लिहिलेली आहेत, निवेदनं दिलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेत फेरफटका मारत असतो. पण आजपर्यंत माझं कोणीही ऐकलेलं नाही. म्हणून आज आमच्यावर हम भी कपिल शर्मा असं बोलण्याची वेळ आलेली आहे. आता तरी आमचा प्रश्न सीएमसाहेब तुम्ही ऐकाल ना! मी एक मुंबईकर" https://twitter.com/NiteshNRane/status/774115454965063681 https://twitter.com/NiteshNRane/status/774106191295188992अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement