एक्स्प्लोर
मुंबईच्या 'निलांबरी'तून पीव्ही सिंधूंची हैदराबादेत जंगी मिरवणूक

मुंबई : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पीव्ही सिंधूवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मायदेशी परतल्यावर सिंधूच्या स्वागताचा मान मुंबईतल्या बेस्टच्या निलांबरी बसला मिळणार आहे.
ओपन डेकची सुविधा असलेली निलांबरी रविवारी सकाळीच हैदराबादला रवाना झाली. पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे 22 ऑगस्ट रोजी भारतात परतणार आहेत.
भारताच्या पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
दोघांच्या स्वागतासाठी तेलंगण सरकारने जय्यत तयारी केली असून हैदराबाद विमानतळापासूनच सिंधू आणि गोपीचंद यांची विजयी मिरवणूक काढण्यात येईल. तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत गेली आहे.जर तुमचं नाव सिंधू आहे, तर मिळवा फ्री पिझ्झा!
पीव्ही सिंधूने अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. सिंधूचा हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्याचाही मनसुबा आहे. सोबतच तिचं आवडतं आईस्क्रिमही तिला खायचं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला जिभेचे चोचले बाजुला ठेवावे लागले होते. मात्र आता देशाची मान अभिमानाने उंचावल्यावर तिला पुन्हा एकदा चटक भागवायची आहे.सिंधू तू क्रिकेटप्रेमी देशाला बॅडमिंटन पाहायला लावलंस- अक्षय कुमार
पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत वर्ल्ड नंबर वन कॅरोलिना मरिनशी मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे.संबंधित बातम्या :
बिर्याणी खायची आहे, रुस्तम पाहायचाय, पीव्ही सिंधूची इच्छा
तीन महिने माझ्याकडे मोबाइल नव्हता: सिंधू
पदक मिळेल असा विचारही केला नव्हता- पीव्ही सिंधू
आई माझा सिंधूसोबत फोटो आहे: सलमान खान
चॅम्पियन प्लेयर ते चॅम्पियन प्रशिक्षक : पुलेला गोपीचंद
सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या यशाची कहाणी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























