एक्स्प्लोर
Advertisement
झाकीर नाईकच्या 'आयआरएफ'वर एनआयए, मुंबई पोलिसांचे छापे
मुंबई : मुस्लिम धर्म प्रसारक झाकीर नाईकशी संबंधित संस्था 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' म्हणजेच 'आयआरएफ'च्या मुंबईतल्या कार्यालयावर एनआयए आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला आहे. केंद्र सरकारनं बंदी आणल्यानंतर आता तपासयंत्रणांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
आयआरएफच्या मुंबईतल्या कार्यालयावर एनआयए आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला. कार्यालयात झाकीर नाईकविरोधात काही ठोस पुरावे सापडतात का, याचा तपास यंत्रणांकडून शोध सुरु आहे.
केंद्र सरकारनं सुरुवातीला आयआरएफचा परदेशातून देणगी स्वीकारण्याचा परवाना रद्द करून आर्थिक कोंडी केली. त्यानंतर आयआरएफवर बंदी आणण्यात आली. आता आयआरएफच्या कार्यालयावर छापा मारुन केंद्रानं झाकीरला मोठा दणका दिला आहे. झाकीर नाईकवर दहशतवाद्यांना चिथवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement