(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mansukh Murder Case : मनसुख हिरण प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक
मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष म्हणजे यूनिट नंबर 11 चे इन्चार्ज होते. मनसुख हिरण प्रकरणानंतर त्यांची बदल लोकल आर्म्स विभागात करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर सुनील माने 2, 3 आणि 4 मार्च मुंबई कमिशनर
मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस निरिक्षक सुनील माने यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष NIA कोर्टानं 28 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. सुनील माने यांना एनआयएनं शुक्रवारी सकाळी अटक केली होती
सुनील माने मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष म्हणजे यूनिट नंबर 11 चे इन्चार्ज होते. मनसुख हिरण प्रकरणानंतर त्यांची बदल लोकल आर्म्स विभागात करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर सुनील माने 2, 3 आणि 4 मार्च मुंबई कमिशनर कार्यालय परिसरातील सीआईयू कार्यालयात गेले होते. ३ मार्चला सुनील माने देखील सीआयईयूमध्ये झालेल्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला मनसुख हिरण यांना देखील बोलवण्यात आले होते. एनआयएला दिलेल्या जबाबात सुनील मानेने सांगितले होते की, कमिशनर कार्यालयात ते आपल्या पर्सनल बंदूकीचा लायसन्स बनवण्यासाठी गेले होते. त्यांना दोन बंदूकीसाठी लायसन्स हवे होते.
सुनील मानेंनी अटक होण्यापूर्वी एबीपी न्यूजशी ऑफ रेकॉर्ड आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच ते एनआयएला तपासासाठी सहकार्य करत असल्याचे देखील सांगितले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आढळल्याप्रकरणी एनआयएने अटक केल्यानंतर एपीआय रियाजुद्दीन काझी यांना 11 एप्रिलला मुंबई पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात काझी यांची या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप एनआयएने केला आहे.
एपीआय रियाझुद्दीन काझी हे 2010 साली एमपीएससीमधून भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाली. जेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली झाली. त्यानंतर रियाझुद्दीन यांना सीआययूमध्ये पाठवण्यात आलं. मात्र अँटिलिया प्रकरणात नाव अल्यानंतर त्यांची सीआययूमधून बदली करण्यात आली. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की एपीआय रियाझुद्दीन काझी यांना सचिन वाझे यांनी केलेल्या सर्व गुन्हाची त्यांनी माहिती होती आणि त्यांची अटक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.