New Year Celebration Mumbai Traffic: नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल; वाचा अधिक माहिती
New Year Celebration Mumbai Traffic: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांचा सेलिब्रेशन मूड लक्षात घेता, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.
New Year Celebration Mumbai Traffic: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी (New Year Celebration) सगळेजण सज्ज झाले आहेत. अनेकांनी खास प्लानिंगदेखील केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि वाहतूक पोलीसही (Mumbai Traffic Police) सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Diversion) ठिकठिकाणी बदल करण्यात आले आहेत. तर, वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईमध्ये आज संध्याकाळपासून 100 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईचा समुद्रकिनाऱ्याजवळील आजूबाजू्च्या रस्त्यावर 'नो पार्किंग झोन' करण्यात आला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाणारा एक मार्ग रस्ता वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. तर, मरीन ड्राईव्हवरील नेताजी सुभाषचंद्र मार्गवरील नरिमन पॉईंटपासून ते प्रिन्सेस ट्रेड फ्लायओव्हर उत्तर दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नववर्षाचे स्वागत जल्लोषात करताना वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८ ते १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ या वेळेत पूर्व मुंबईत करण्यात आलेल्या वाहतुकीचे नियोजन खालील प्रमाणे: pic.twitter.com/pQza4lIo5u
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 31, 2022
पश्चिम मुंबईत अशी आहे वाहतूक व्यवस्था
जुहू रोड, जुहू तारा रोड, वैकुंठलाल मेहता मार्ग, एस. व्ही. रोड आदी ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत.
नववर्षाचे स्वागत जल्लोषात करताना वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८ ते १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ या वेळेत पश्चिम मुंबईत करण्यात आलेल्या वाहतुकीचे नियोजन खालील प्रमाणे: pic.twitter.com/hiViWTdzzL
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 31, 2022
मध्य मुंबईत काय आहे वाहतूक व्यवस्था
मध्य मुंबईतील वरळी सी-फेसवर होणारी गर्दी लक्षात घेता काही ठिकाणी नो-पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे.
नववर्षाचे स्वागत जल्लोषात करताना वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८ ते १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ या वेळेत मध्य मुंबईत करण्यात आलेल्या वाहतुकीचे नियोजन खालील प्रमाणे: pic.twitter.com/qcmF7eBHLF
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 31, 2022
आज शनिवारी, रात्री आठ वाजल्यापासून ते रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल असणार आहेत.