एक्स्प्लोर
शिवसेनेने ‘करुन दाखवलं’, नवाब मलिकांचा शिवसेनेला टोला, घरातील गुडघाभर पाण्याचे फोटो ट्वीट
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या घरात पाणी शिरले आहे. याचे फोट ‘करुन दाखवलं’ म्हणत ट्विट करत शिवसेनेला जोरदार टोला लगावला. तसेच मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्वीट करत मुंबई महापालिकेचेही आभार मानले आहेत.
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. त्याशिवाय याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसला आहे. काल पासून सुरु असलेल्या पावसामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. याबद्दलची माहिती स्वत: नवाब मलिक ट्वीट करत दिली. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या घरात पाणी शिरले आहे. याचे फोट ‘करुन दाखवलं’ म्हणत ट्विट करत शिवसेनेला जोरदार टोला लगावला. तसेच मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्वीट करत मुंबई महापालिकेचेही आभार मानले आहेत. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे ठाणे, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे कुर्ला, सायन, विद्याविहार स्थानकात अनेक लोकल गाड्या रखडल्या आहेत.Thanks @MCGM_BMC pic.twitter.com/VTmhEtKcav
— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ
— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement