एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Navneet Rana : नवनीत राणांच्या अडचणीत आणखी वाढ; 'डी' गँग कनेक्शनची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि दाऊद इब्राहिमच्या गँगशी असलेल्या संबंधाबाबत मुंबई पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे.

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळची व्यक्ती समजली जाणारी युसूफ लकडावालाकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या EOW कडे चौकशी करण्यात येणार आहे. 

युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी राणा यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्राचा दाखला देत हे आरोप केले आहेत.  हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून राणा दाम्पत्य आणि डी गॅंगच्या संबंधाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे.  

महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे याबाबत लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर EOW कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या EOW कडून आयएनएस विक्रांत निधी  अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू आहे. 

युसूफ लकडावालाचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि तो डी गँगचा फायनान्सर असल्याचं सांगितलं जायचं. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीनं त्याला अटक केली होती. कॅन्सरग्रस्त असल्यानं आर्थर रोड कारागृहात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget