एक्स्प्लोर
वाशीच्या हिरानंदानी रुग्णालयाला पालिकेची कारणे दाखवा नोटीस
नवी मुंबई : वाशीतल्या प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयाला नवी मुंबई महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हिरानंदानी रुग्णालयानं फोर्टीस रुग्णालयाशी परस्पर करार करुन जागा वापरायला दिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
नवी मुंबई मनपानं 26 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड हिरानंदानी समूहाला भाडे तत्त्वावर दिला होता. मात्र हिरानंदानी समूहानं मनपाच्या अटी-शर्तींचा भंग करुन ती जागा फोर्टीस रुग्णालयाला दिल्याची माहिती आहे.
नवी मुंबईचे महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्या कृपाशिर्वादामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र तुकाराम मुंढे यांच्या दणक्यानंतर हिरानंदानी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली.
दरम्यान मुंबई महापालिकेनं पाठवलेल्या नोटीशीवर अद्याप हिरानंदानी रुग्णालयाने प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement