एक्स्प्लोर
नवी मुंबईत दुकानाला आग, मायलेकीचा गुदमरुन मृत्यू
कानात खेळण्यांचं साहित्य आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग जलद भडकली. बाहेर पडता न आल्यामुळे धुरात गुदमरुन मायलेकीचा मृत्यू झाला
नवी मुंबई : नवी मुंबईत दुकानाला लागलेल्या आगीत मायलेकीचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी स्टोअरला लागलेल्या आगीत 25 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 5 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला.
गुरुवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. दुकानात खेळण्यांचं साहित्य आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग जलद भडकली. सर्वत्र धुराचं साम्राज्यही पसरलं.
या घटनेत दुकानाच्या वर राहणाऱ्या मंजू चौधरी आणि मुलगी गायत्री चौधरी यांचा मृत्यू झाला. आग लागल्यावर मंजू यांचे पती दोन वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर धावले.
पत्नी आणि मोठ्या मुलीला घराबाहेर आणण्यासाठी ते पुन्हा गेले, मात्र आगीमुळे दोघींना पटकन घराबाहेर पडता आलं नाही. तोपर्यंत मायलेकीने गुदमरुन प्राण सोडला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
नागपूर
Advertisement